लवकरच येत आहेत तुमच्या भेटीला माझ्या कविता.
गीत शेवटीचे…
गीत त्याचे शेवटीचे गात होता
आजही तो का तिच्या शोधात होता ?
ते शब्द होते जगाला जाळणारे
ऐकणारा आज अंधारात होता
मी नव्हतो एकटा भांडावयाला
ध्यास माझा आजही माझ्यात होता
जिंकलेले डाव मी सोडून गेलो
राग त्याचा का तुझ्या डोळ्यात होता ?
मी असामी रोज साधा वागणारा
पेटतो येथे निखारा रात होता
स्वार्थही जपतात येथे धावणारे
कैकयीचा द्वेषही त्यांच्यात होता
शोधण्या कोठे निघालो मी किनारे
तो हिमालय आज रे पाण्यात होता
आनंद माने